तुळजापूर प्रतिनिधी
उमरगा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रवीणजी स्वामी यांनी आज सिटी फ्लॉवर स्टॉल ला सदिच्छा भेट देत व्यावसायिक मनमोकळा संवाद साधला. या विशेष प्रसंगी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले आणि सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व उमरगा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अब्दुल रजाक अत्तार, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे तालुकाप्रमुख संजय पवार, तसेच भूमिपुत्र वाघ, दळगडे साहेब, मुस्तफा इनामदार, पत्रकार अहमद अन्सारी उपस्थिती होती.
जनसंपर्क आणि विकासावर भर
या भेटीदरम्यान आमदार प्रवीण स्वामी यांनी व्यावसायिक, संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. त्यांनी उमरग्यातील विकासकामे, नव्या योजनांची अंमलबजावणी आणि स्थानिकांच्या हिताच्या विषयांवर सकारात्मक चर्चा केली.
