छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जनहित संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी

mhcitynews
0

तुळजापूर प्रतिनिधी 

जनहित संघटनेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. जनहित मुख्यालयात शिवरायांच्या मूर्तीची विधिवत स्थापना व पूजन करून महाआरती करण्यात आली.


यानंतर, छत्रपती शिवाजी महाराज की जय! भवानी माता की जय! जय जिजाऊ! जय शिवराय! अशा गगनभेदी जयघोषात भव्य पदफेरी काढण्यात आली. ही पदफेरी शहराच्या प्रमुख मार्गांनी भ्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचली, जिथे अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.


यावेळी जनहित संघटनेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सवात सक्रिय सहभाग घेतला.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top