तुळजापूर / सिद्दीक पटेल
शहरातील जिजामाता नगर महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सामाजिक कार्याचा अभूतपूर्व वारसा जपत युवा नेते विनोद पिटुभैय्या गंगणे यांनी शेकडो कुटुंबांना फळे व फराळ साहित्य वाटप करून उत्सवाला सेवाभावी रंग भरले.
विनोद पिटुभैय्या गंगणे हे केवळ नावाने नव्हे, तर आपल्या कार्याने समाजसेवेचा दीप प्रज्वलित करणारे नेतृत्व आहे. दिवाळी असो किंवा रमजान, ते नेहमीच समाजातील विविध घटकांना मदतीचा हात देतात. दिवाळीत हजारो कुटुंबांना फराळ वाटप, रमजान महिन्यात मुस्लिम बांधवांसाठी इफ्तारची व्यवस्था आणि आज महाशिवरात्री निमित्त साबुदाणा, भगर, खरबूज, कलिंगड व रताळे यासारख्या उपवासासाठी आवश्यक पदार्थांचे वाटप करून त्यांनी आपली लोकसेवेची परंपरा कायम राखली.
या समाजोपयोगी उपक्रमास मा. नगराध्यक्ष सचिन भैय्या रोचकरी, आनंद दादा कंदले, विशाल भैय्या छत्रे, लखन पेंदे, शहराध्यक्ष शांताराम पेंदे, संतोष इंगळे व इतर मान्यवरांची उपस्थिती लाभली.
विनोद पिटुभैय्या गंगणे यांच्या या सततच्या समाजकार्यामुळे ते जनतेच्या सुख-दुःखात नेहमीच सहभागी होणारा नेता म्हणून ओळखले जातात. महाशिवरात्रीच्या या सेवाभावी उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
