जय भवानी तरूण मंडळ आणि जाणता राजा युवा मंचतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

mhcitynews
0

 


जय भवानी तरुण मंडळ व जाणता राजा युवा मंचच्या संयुक्त विद्यमाने भव्य सोहळा – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत शिवआरती आणि सत्कार समारंभ

तुळजापूर प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जय भवानी तरुण मंडळ आणि जाणता राजा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आणि दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. शिवरायांच्या गजरात, टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भगव्या ध्वजांच्या साक्षीने हा उत्सव जल्लोषात पार पडला.


कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील उपस्थिती लाभली . त्यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून मंत्रोच्चारात महाआरती केली. यानंतर, मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अमोल कुतवळ यांच्या हस्ते मंत्री महोदयांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.


या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुरेश दाजी बिराजदार, जिल्हाध्यक्ष महेंद्र काका धुरगुडे, जेष्ठ नेते गोकुळ तात्या शिंदे, तालुका अध्यक्ष बबलू सूर्यवंशी, मंडळाचे अध्यक्ष सुदर्शन वाघमारे, समाधान परमेश्वर, प्रविण कदम, संजय लोंढे, नागेश किवडे, बाबा मस्के, किरण पाठक, पोफळे आप्पा यांसह सर्व मंडळाचे सभासद आणि हजारो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिवरायांचा जयघोष करत, भगव्या ध्वजांची पदयात्रा शहरभर निघाली. संपूर्ण वातावरण "छत्रपती शिवाजी महाराज की जय!", "जय भवानी! जय शिवराय!" या गगनभेदी घोषणांनी दुमदुमून गेले.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top