विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लावणारा उपक्रम – आनंद कंदले मित्र परिवाराने दाखवला ‘छावा’ चित्रपट

mhcitynews
0

तुळजापूर / प्रा. चव्हाण सर 

छत्रपती संभाजी महाराज यांचा तेजस्वी आणि बलिदानमय इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. 2 च्या विद्यार्थ्यांना ‘छावा’ चित्रपट मोफत दाखवण्यात आला. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आणि रुग्ण कल्याण समिती सदस्य आनंद (दादा) कंदले मित्र परिवाराच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाचे औचित्य साधत हा प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला.


कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली. यावेळी नगरसेवक विजय कंदले, नरेश अमृतराव, मुख्याध्यापक गणेश रोचकरी, महेंद्र कावरे, राम चोपदार, सागर कदम, जीवनराजे इंगळे, अण्णा देवकर, महेंद्र पाटील, बाळासाहेब जेटीथोर, सुज्ञानी गिराम, किरण लोहारे, विद्यादेवी स्वामी, शिवाजी डाके तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका आणि कर्मचारी उपस्थित होते.


१०१ विद्यार्थ्यांसाठी मोफत चित्रपट, पाणी आणि खाऊची व्यवस्था

विद्यार्थ्यांना चित्रपट पाहताना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून मोफत पिण्याच्या पाण्याची आणि खाऊची व्यवस्था आनंद दादा कंदले मित्र परिवारातर्फे करण्यात आली.


विद्यार्थ्यांची ह्रदयस्पर्शी प्रतिक्रिया

चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाचे दृश्य पाहून अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. शंभू युवराज शिंदे आणि कु. शितल रविकिरण साळुंखे या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर प्रभावी भाषण केले.


इतिहासाची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम

यापूर्वी आनंद कंदले यांनी ‘शेर शिवराय’ हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखवला होता. आर्थिक दृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना ऐतिहासिक चित्रपट पाहता यावेत आणि त्यांना आपल्या महान इतिहासाची जाणीव व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.


विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारा हा स्तुत्य उपक्रम निश्चितच समाजातील इतर लोकांसाठी आदर्शवत ठरेल!



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top