धाराशिव प्रतिनिधी
शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, धाराशिव येथे महायुतीच्या खरेदी-विक्री संघाच्या बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या हस्ते नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
अनंतराव अण्णा देशमुख, गुणवंत पापा देशमुख, किशोर देशमुख, सौ. मीरा जीवन बर्डे, रामेश्वर शेटे, शिवाजी सरडे, अण्णासाहेब पवार, दिनेश देशमुख, सुभाष पाटोळे, सौ. मीरा इंगळे आणि गणेश दत्तात्रेय फंड हे सर्व संचालक बिनविरोध निवडून आले.
सत्कार समारंभानंतर जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी नवनिर्वाचित संचालकांचे अभिनंदन केले. त्यांनी संघाच्या भविष्यातील यशस्वी कारभारासाठी शुभेच्छा देत, सर्व संचालकांनी शेतकरी व व्यापाऱ्यांच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
महायुतीच्या या बिनविरोध निवडीनंतर संघाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.