श्रीराम नवमीनिमित्त तुळजापुरात तीन दिवसीय श्रीराम कथेचे आयोजन

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

श्रीराम नवमीच्या पावन निमित्ताने तुळजापूर शहरात भक्तिरसाने न्हालेलं एक विशेष धार्मिक आयोजन करण्यात आलं आहे. येथील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदीर, कासार गल्ली येथे 3 एप्रिलपासून 5 एप्रिलपर्यंत तीन दिवसांची श्रीराम कथा आयोजित करण्यात आली आहे.


दररोज दुपारी 4 ते 7 या वेळेत कथा, संकीर्तन, आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. भक्तांनी या धार्मिक कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


ही कथा आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) धाराशिव आणि हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, कथा इस्कॉनचे श्रीमान प्रजापती विष्णुदास (PSI, लातूर) यांच्या श्रीमुखातून होणार आहे.


या निमित्ताने तुळजापूर शहरात भक्तिभावाने भारलेले वातावरण निर्माण होणार असून, श्रीराम कथा श्रवणाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top