मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना | ८१० ज्येष्ठ नागरिक अयोध्येच्या तीर्थयात्रेला उद्या होणार रवाना

mhcitynews
0


धाराशिव प्रतिनिधी

मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ८१० पात्र जेष्ठ नागरिकांची निवड करण्यात आली असून,त्यांना श्रीराम मंदिर,अयोध्या येथे मोफत तीर्थदर्शनाची संधी मिळणार आहे.ही यात्रा ५ एप्रिल २०२५ रोजी धाराशिव येथून रेल्वेने सुरू होईल आणि ९ एप्रिल २०२५ रोजी संपेल. 

    

या योजनेअंतर्गत ज्या ६० वर्षांवरील व वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपर्यंत असलेल्या जेष्ठ नागरिकांनी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज सादर केले होते. त्यानुसार या निवड झालेल्या लाभार्थ्यांना वेळेत हजर राहण्याच्या सूचना दुरध्वनी व गृहभेटींद्वारे समाज कल्याण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 


यात्रेदरम्यान लाभार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी दोन वैद्यकीय अधिकारी व दोन पॅरामेडिकल कर्मचारी सोबत असणार आहेत.तसेच समाज कल्याण विभागाच्या १६ कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. श्रीराम नवमी (६ एप्रिल २०२५) निमित्त अयोध्येत मोफत तीर्थदर्शनाची संधी मिळाल्याने जिल्ह्यातील या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.यात्रेच्या उद्घाटन समारंभास पालकमंत्री व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना आमंत्रित करण्यात आले आहे,अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त बाबासाहेब अरवत यांनी दिली.


Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top