तुळजापूर शहरातील स्वच्छता, लाईट आणि पाणी समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात – सचिन रोचकरी

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

तुळजापूर शहरातील स्वच्छता, लाईट आणि पाणी यासारख्या महत्त्वाच्या समस्या लक्षात घेता नगर परिषद मुख्याधिकारी श्री. रणदिवे साहेब यांची मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीत शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


सध्या तुळजापूरमध्ये चैत्री यात्रेची लगबग आहे. यात्रेदरम्यान शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्था सक्षम ठेवणे, सार्वजनिक ठिकाणी लाईटची सुविधा सुरळीत राहणे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा व्यवस्थित राहणे अत्यंत आवश्यक आहे, असे मा. नगराध्यक्षांनी यावेळी सांगितले.


मुख्याधिकारी रणदिवे साहेब यांना यासंदर्भात लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, जेणेकरून चैत्री यात्रेदरम्यान नागरिकांना कोणतीही अडचण येणार नाही, अशी मागणी नगराध्यक्ष रोचकरी यांनी केली. यावेळी मा नगरसेवक विजय आबा कंदले, समर्थ पैलवान उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top