कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण; पक्ष संघटन बळकट होणार
तुळजापूर प्रतिनिधी
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, व प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करण्याच्या उद्देशाने, तुळजापूर तालुक्यातील युवा नेतृत्व म्हणून दिनेश बागल यांची भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे.
महादेव आण्णासाहेब जाधव (मंडळ अध्यक्ष, तुळजापूर ग्रामीण) यांनी अधिकृत पत्रकाद्वारे ही घोषणा केली. विविध राजकीय, सामाजिक कार्यांमधून सक्रिय सहभाग नोंदवणारे दिनेश बागल यांची ही निवड कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी ठरली आहे.
दिनेश बागल यांनी पक्षवाढीसाठी कटिबद्ध राहून नवयुवकांमध्ये भाजपचे विचार पोहोचवण्याचे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा अधिक सक्षम, संघटित व जोमदार कार्य करेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
