शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी संघर्षशील नेतृत्वाची निवड
तुळजापूर प्रतिनिधी
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या संघटन बळकटीसाठी तुळजापूर तालुक्यातील किसान मोर्च्याच्या तालुकाध्यक्षपदी विजय निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप तुळजापूर ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष महादेव आण्णासाहेब जाधव यांनी अधिकृत पत्रकाद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. विजय निंबाळकर हे ग्रामीण भागातील अनुभवी व अभ्यासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. त्यांचा शेतकरी प्रश्नांवरील व्यापक अभ्यास आणि संघर्षशील कार्यपद्धतीमुळे ही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.
त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आशेचा किरण जागवला आहे. आगामी काळात शेतकरी हिताचे मुद्दे प्रभावीपणे मांडून केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ तळागाळात पोहोचवण्याचे काम ते करतील, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
