जेव्हा लोकसेवा हेच जीवनमूल्य बनतं… जेव्हा समाजासाठी झिजणं हीच आपली जबाबदारी वाटू लागते… तेव्हा निर्माण होतं सज्जन मामा साळुंखे यांसारखं व्यक्तिमत्त्व!
मनोज दादा जरांगे पाटील यांचं धगधगतं विचारसरणी अंगीकारत, मराठा समाजाच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे झगडणारा आणि सामान्य जनतेचा खंदा आधार असलेला नेता म्हणजे सज्जन मामा साळुंखे. राजकारण, समाजकारण आणि धर्मकारण यांचा समतोल साधणाऱ्या या योद्ध्याचं व्यक्तिमत्त्व सर्वसामान्यांसाठी आशेचा किरण, युवकांसाठी प्रेरणा, आणि गरिबांसाठी आधार ठरलं आहे.
🔸 श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून अध्यात्मिक सेवेत समर्पित
🔸 धाराशिव जिल्हा कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून व्यावसायिक प्रामाणिकपणाचं प्रतीक
🔸 माजी नगरसेवक आणि भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकांच्या प्रश्नांवर लढणारा कार्यकर्ता
आज समाजात जिथे बडेजाव, दिखावा आणि स्वार्थ वाढत आहे, तिथे सज्जन मामांचं कार्य निःस्वार्थ, खऱ्या समाजभानातून आणि जनतेच्या विश्वासातून घडत आहे.
त्यांची ओळख "सत्ता नव्हे, सेवा हीच खरी ताकद" अशी आहे.
त्यांनी अनेक वेळा आपल्या कष्टाच्या पैशातून गोरगरीबांना मदत केली, कोणताही गाजावाजा न करता. त्यांचं मनमिळाऊ आणि प्रेमळ वर्तन हेच त्यांचं सर्वात मोठं वैभव आहे.
🛡️ "मराठा समाजाचा आत्मसन्मान... युवकांचा अभिमान!"
सज्जन मामा साळुंखे – नावातच सज्जनता, कृतीतच नेतृत्व!
वाढदिवसानिमित्त
🙏 श्री तुळजाभवानी चरणी प्रार्थना की,
आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यशाची अखंड साथ लाभो!
आपलं मार्गदर्शन आणि नेतृत्व जनतेच्या सेवेसाठी सदैव प्रेरणा ठरू दे!
संपादक
सिद्दीक पटेल...
