काक्रंबा प्रतिनिधी
मौजे काक्रंबा येथील भिमनगरमध्ये समाज मंदिरासाठी शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर यांच्या विशेष प्रयत्नातून धाराशिवचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या उल्लेखनीय कार्याबद्दल भिमनगर येथील समाजबांधवांकडून चेतन बंडगर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभावेळी दयासागर मस्के, शाहूराज मस्के, धर्मा मस्के, बाळासाहेब मस्के, सुधीर मस्के, आकाश मस्के, अरविंद चंदनशिवे, किशोर सोनवणे, प्रदीप चंदनशिवे, हनमंत मस्के, झुंबर मस्के, उत्तम चंदनशिवे, शरद मस्के, दीपक भिसे व विनोद साबळे आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
चेतन बंडगर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून, ते गावातील तसेच तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी नेहमी पुढाकार घेत असतात. त्यांच्या प्रयत्नातून मिळालेला निधी समाजमंदिराच्या उभारणीसाठी मोठी मदत ठरणार आहे.
