तुळजापूर प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिर आणि तुळजापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकारकडून ऐतिहासिक निधीची घोषणा करण्यात आली असून, या विकासनिधीबद्दल तुळजापूर शहरवासीयांच्या वतीने मंत्रीमंडळातील मान्यवरांचा व मित्रा उपाध्यक्ष तथा आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचा भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा गुरुवारी, ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.२५ वाजता श्री भवानी कुंड, घाटशिळ रोड परिसरात संपन्न होणार.
या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ६ ऑगस्ट रोजी भवानी तीर्थकुंड येथे प्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून, शहरातील सर्व नागरिकांना आणि मान्यवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
या सोहळ्यास महंत तुकोजीबुवा, महंत इछागिरी महाराज, महंत योगी मावजीनाथ बाबा, महंत चिलोजी बुवा, व्यंकट अरण्य महाराज, महंत हमरोजी बुवा, गुरू महंत वाकोजीबुवा, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, आमदार अभिमन्यू पवार, आमदार सुरेश धस, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, माजी खासदार रविंद्र गायकवाड यांच्यासह विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे व ज्येष्ठ नेते बाळासाहेब शामराज असून, आयोजन समितीमध्ये युवा नेते विनोद गंगणे, आनंद कंदले, सचिन रोचकरी, शांताराम पेंदे, नरेश अमृतराव, धर्यशील दरेकर, उमेश गवते, राजेश्वर कदम, औंदुंबर कदम, सचिन कदम यांचा समावेश आहे.
