राणाजगजीतसिंह पाटील यांच्या भव्य कार्याचा नागरी सत्काराने गौरव!

mhcitynews
0


"आई भवानीच्या कृपेने मंत्रिमंडळात होणार समावेश – बावनकुळे"

तुळजापूर प्रतिनिधी

आई तुळजा भवानीच्या तुळजापूरचा कायापालट करण्याचे पवित्र कार्य आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हातून घडत असून हे कार्य हजारो वर्ष लक्षात ठेवले जाणार असल्याचे गौरवोद्गार महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तुळजापूर येथे आयोजित केलेल्या नागरी सत्कारात काढले.


यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी आमदार सुजितसिंह ठाकूर ,राजाभाऊ राऊत ,जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, अर्चनाताई पाटील, युवा नेते विनोद गंगणे, माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, बाळासाहेब शिंदे, माजी सभापती विजय गंगणे, महंत मावजीनाथ महाराज, महंत तुकोजी बुवा महाराज, महंत चिलोजीबुवा महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज उपस्थित होते.


यावेळी बोलताना बावनकुळे म्हणले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी चौंडी येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत तुळजापूर विकास आराखड्यास मंजुरी दिली आहे. या विकासा आराखड्यासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पाठपुरावा केला होता. तसेच हे कार्य घडवण्यासाठीच आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा जन्म झाला असल्याचे बावनकुळे यांनी म्हटले आहे.


बावनकुळे पुढे म्हणाले की आई जगदंबेच्या या पवित्र नगरीमध्ये एका कर्तृत्ववान नेत्याचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले असून देव देश धर्माकरिता कार्य करणारे अमर राहतात तसेच तुळजापूरच्या जनतेचे आभार आहेत की त्यांनी राणाजगजीतसिंह पाटील यांना निवडून देऊन विधानसभेत पाठवले आहे. देशातील सर्वात संपन्न राज्य हे महाराष्ट्र झाले पाहिजे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न असून महाराष्ट्राच्या खऱ्या विकासात सुरुवात झाली असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.



समाजाचे दुःख आपलं म्हणणारे नेते राणाजगजीतसिंह पाटील असून आगामी काळात लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले यावेळी तालुकाध्यक्ष आनंद कंदले, सुनील चव्हाण, संतोष बोबडे, दिनेश बागल, राजेश्वर कदम, निलेश रोचकरी, धैर्यशील दरेकर, समर्थ पैलवान, रोहित चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लवकरच मंत्रिमंडळात समावेश

यावेळी तुळजापूरची मा. नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करावा अशी मागणी बावनकुळे यांच्याकडे केली त्याला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की आई तुळजाभवानीच देवेंद्र फडणवीस यांना सांगणार आहे की आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश करा त्यामुळे लवकरच राणाजगजीतसिंह पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याच्या आशा उंचावले आहेत .


महाराष्ट्रा पहिल्या दहा आमदारात राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव 

राणाजगजीतसिंह पाटील हे उत्कृष्ट कार्य करणारे आमदार असून महाराष्ट्रातील पहिल्या दहा आमदारांमध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा क्रमांक लागतो अशा कर्तुत्वान नेत्याचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले असल्याचे बावनकुळे म्हणाले .


तुळजापूर करांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या सत्कार समारंभासाठी तुळजापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेला दिसून आला संपूर्ण भवानी कुंड हे पूर्णपणे भरलेले होते गेल्या पंधरा दिवसापासून शहरातील नागरिकांनी व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या समारंभासाठी मोठे परिश्रम घेतले होते.



Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top