सत्य वचन पेंदे लखन | भावंडांच्या स्नेहाचा उत्सव; रक्षाबंधन सोहळा भावनिक वातावरणात संपन्न

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

प्रेम, विश्वास आणि आपुलकीचा धागा अधिक घट्ट करत, विनोद पिटू भैया गंगणे व लखन भैया पेंदे यांच्या वतीने आयोजित रक्षाबंधन सोहळा उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. बहिणींनी हृदयात भावनिक ओलावा घेऊन भावांना राखी बांधली, तर भावांनी साडीची भेट देऊन बहिणींचा सन्मान केला.


विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमात बहिणींनी भावाच्या प्रेमळ सन्मानामुळे समाधान व्यक्त केले. भावंडांच्या स्नेहाचा, विश्वासाचा आणि जिव्हाळ्याचा हा सोहळा परिसरात चर्चेचा विषय ठरला.


कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष आप्पा इंगळे, सचिन साळुंखे, भरत जाधव, संतोष ठावरे, संतोष मामा लबडे, अमर केवडकर, भैय्या डाके, राजू पठाण, सुदर्शन पेंदे, माऊली भोसले व रामेश्वर सूर्यवंशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top