“आई-वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेली सेवा ठरली महिलांसाठी आधार : श्रावण सोमवारी उपक्रमाला दाद”

mhcitynews
0

तुळजापूर | सिद्दीक पटेल

श्रावण महिना म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक ऐक्याचा प्रतीक. याच भावनेतून स्व. अरुण (काका) कंदले व स्व. पुष्पा (काकी) कंदले यांच्या स्मरणार्थ तुळजापूरात महिलांसाठी मोफत वाहन सेवेचा उपक्रम राबवण्यात आला. पवित्र श्रावण महिन्यातील दर सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री मुद्गुलेश्वर मंदिर या मार्गावर या सेवेला हजारो माता-भगिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.


श्री मुद्गुलेश्वराच्या दर्शनासाठी महिलांनी पारंपरिक पद्धतीने चालत जाण्याची परंपरा जोपासली असली तरी परतीच्या प्रवासात दिलेल्या या सेवेने त्यांना मोठा दिलासा मिळाला. शहरातील अनेक जेष्ठ महिला ज्यांना प्रवासात अडचणी व सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत होता, त्यांच्यासाठी हा उपक्रम सामाजिक आधार ठरला.


ही सेवा केवळ प्रवासापुरती मर्यादित न राहता महिला सन्मान, श्रद्धा आणि सेवा या तिन्हींचा संगम ठरल्याचे नागरिकांनी नमूद केले. समाजात महिला सुरक्षिततेसाठी राबवलेला हा उपक्रम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे भाविकांनी मत व्यक्त केले.


“आई- वडिलांच्या स्मरणार्थ हा उपक्रम सुरू केला, माता-भगिनींच्या सोयीसाठी व सुरक्षिततेसाठी जोवर शक्य आहे तोवर ही सेवा श्रावण सोमवारी सुरू ठेवण्याचा मानस असल्याचे 

आयोजक आनंद कंदले यांनी यावेळी बोलताना म्हणाले.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top