तुळजापूर प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छतेचा संदेश देत श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापूर येथे २ ऑक्टोबर रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या अभियानात विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षकवृंद व कर्मचारी वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले. शाळा परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. यावेळी “स्वच्छता हीच सेवा” या ब्रीदवाक्याचा प्रत्यय देत विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
अभियानादरम्यान विद्यालयाचे प्राचार्य श्री. घोडके सर यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व शिक्षकांनी श्रमदान करत परिसराची स्वच्छता केली.
या उपक्रमाद्वारे स्वच्छ भारत अभियानाचा संदेश तुळजापूरच्या जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
