मंगल आरतीस उत्स्फुर्त प्रतिसाद !

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी 

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ - इस्कॉन धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मंगल आरतीस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला . जिजामाता नगरातील श्री विठ्ठल - रुक्मिणी मंदिरात पहाटे 04:45 वाजताच भाविकांनी हजेरी लावली होती . मंगल आरती, तुलसी आरती, चैतन्य अष्टकम झाल्यानंतर सर्व भक्तांकडून 16 माळा जप करवून घेण्यात आला.


कार्तिक मासनिमित्त भगवंतांना दीपदान देखील करण्यात आले . पहाटेच्या प्रसन्न वातावरणात आरतीसाठी भाविकांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येते . इस्कॉन धाराशीव व इस्कॉन तुळजापूरच्या वतीने शहरात अनेक ठिकाणी नेहमीच सत्संग व प्रवचन आदि आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top