इस्कॉनतर्फे तुळजापुरात ' दीपदान ' उत्सव!

mhcitynews
0

 


तुळजापूर प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ ( इस्कॉन ) धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या वतीने आई जगदंबेच्या महाद्वारात भव्य असा ' दीपदान ' उत्सव घेण्यात आला . पवित्र अशा कार्तिक महिन्यात भगवंतांना तुपाचा दिवा अर्पण करण्याची ( ओवाळण्याची ) पद्धत स्कंद पुराण व पदमपुराणात वर्णित आहे . दीपदान केल्यामुळे आपली अनेक जन्माची पापे नष्ट होऊन मनुष्याची जन्म - मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते व मनुष्य वैकुंठ धाम प्राप्त करू शकतो . असे याचे महत्व आहे . 

बलिप्रतिपदेच्या सायंकाळी 06 : 00 वा . हरे कृष्ण महामंत्राच्या संकीर्तनाने दीपदानास सुरुवात झाली . तुळजापुरचे लोकप्रिय आमदार मा. राणा जगजितसिंह जी पाटील साहेब, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मा . नितीनजी काळे साहेब यांनीही या उत्सवास भेट देऊन आयोजकांचा आनंद द्विगुणीत केला . या उत्सवात 2000 पेक्षा अधिक देवी भक्तांनी या दीपदानाचा लाभ घेतला . आयोजकांनी सर्व तयारीने परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला . दीपदानाचे हे पहिलेच वर्ष होते हा उत्सव पुढेही चालू ठेवण्याचा निर्धार आयोजकांनी बोलून दाखवला .

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top