लाडक्या बहिणींसाठी भाऊबीज वाटप — तब्बल ५ हजार कुटुंबियांना मदतीचा हात

mhcitynews
0



आ. राणाजगजितसिंह पाटील सह मान्यवरांचा उपस्थितीत वाटप!


तुळजापूर / सिद्दीक पटेल

तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील गोरगरीब कष्टकरी कुटुंबीयांना दिपावलीचा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी युवा नेते विनोद पिटूभैय्या गंगणे वतीने शहरातील तब्बल ५००० कुटुंबांना गेली सोळा वर्षापासून दिवाळी किराणा किट चे वाटप करण्यात येत आहे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी किराणा किटची भाऊबीज म्हणून लाडक्या बहिणींना मदतीचा हात म्हणून किटचे वाटप होणार असल्याची माहीती युवा नेते विनोद गंगणे यांनी दिली..सदरील कार्यक्रम  सायंकाळी ६ वाजता हाडको मैदान येथे होणार आहे आमदार राणाजगजीतसिंह पाटील, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, भाजप नेते सुनील चव्हाण, युवा नेते विनोद गंगणे, मा.नगराध्यक्ष सचिन रोचकरी तालुकाध्यक्ष आनंद कंदले,  सज्जन सांळुके, शांताराम पेंदे यांच्या हस्ते या दिपावली भेट किट चे वाटप होणार आहे


लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा आणि भावनिक नात्याचा साजरा करण्याचा हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविला जात आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत प्रत्येक वर्षी या उपक्रमाद्वारे बहिणींना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न आयोजकांकडून केला जातो.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top