पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरण
तुळजापूर प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, तसेच पक्ष सचिव संजय पुष्पलता मोरे यांच्या स्वाक्षरीने धाराशिव जिल्ह्यातील उमरगा-लोहारा व तुळजापूर विधानसभा क्षेत्रासाठी श्रीमती मीनाताई रामचंद्र सोमाजी कदम यांची महिला सेना जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती शिवसेना पक्षाच्या संघटनबळात नवसंजीवनी देणारी ठरणार असून, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सोमाजी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा प्रमुख मोहन पणुरे, तालुकाप्रमुख अमोल जाधव, शहर संघटक प्रशांत उर्फ नितीन मस्के, उपशहरप्रमुख रमेश (काका) चिवचवे, शहाजी हाके, स्वप्निल सुरवसे, अंकुश रुपनर, गणेश पाटील, संजय लोंढे, तसेच महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीमती मीनाताई सोमाजी कदम यांच्या नियुक्तीमुळे महिला सेनेला नवे बळ लाभले असून, आगामी काळात महिला वर्गाच्या प्रश्नांसाठी तसेच पक्षविस्तारासाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
