तुळजापूर प्रतिनिधी
आई जगदंबेच्या पावन भूमित बाहेर गावाहून आलेल्या देवी भक्तांसाठी इस्कॉन - धाराशीव व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांच्या वतीने इस्कॉन खिचडीचे वाटप करण्यात आले . आर्य चौकात कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून हा कार्यक्रम पार पडला .
इस्कॉन जगभरात 180 पेक्षा जास्त देशांत भगवदगीतेचा, श्रीमद् भागवताचा व हरिनामाचा प्रचार प्रसार करत आहे . इस्कॉन मंदिरातील खिचडी जगभर प्रसिद्ध आहे म्हणूनच या विशेष खिचडी वाटपाचे आयोजन केले होते . यासाठी धाराशीव येथील इस्कॉनचे अध्यक्ष श्रीमान नरहरी प्रभूजी यांची विशेष उपस्थिती होती . यामध्ये 1500 ते 1600 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला . सर्व टीमने मनापासून परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला . प्रसाद वाटपाचे यंदाचे हे दुसरे वर्ष होते .
