तुळजापूर /सिद्दीक पटेल
तुळजापूर नगरपरिषद निवडणूक 2025 साठीची आरक्षण सोडत आज पंचायत समिती सभागृहात पार पडली. सोडतीदरम्यान उत्सुकता आणि तणावाचे दिसून आले. प्रत्येक प्रभागाचा निकाल जाहीर होताच सभागृहात आनंद–निराशेचे मिश्र वातावरण दिसले.
एकूण 11 प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असून, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, सर्वसाधारण आणि महिलांसाठी जागांचे वाटप जाहीर झाले आहे. काही ठिकाणी जुन्याच नेत्यांना तर काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
आरक्षण सोडतीनंतर तुळजापूर शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भावी नगरसेवकांनी प्रचारयंत्रणा सुरू करण्याची तयारीही लागलीच सुरू केली असून, काही ठिकाणी नव्या आघाड्यांच्या चर्चांना उधाण आले आहे.
प्रभागनिहाय आरक्षण निश्चित झाल्यामुळे स्थानिक राजकीय पक्ष आपले उमेदवार ठरवण्यासाठी अंतर्गत चर्चांना सुरुवात करणार असल्याची माहिती मिळते. यंदाची निवडणूक ही पूर्ण टर्मनंतर होत असल्याने “कोण नगरपरिषदेवर झेंडा फडकवणार?” हा प्रश्न तुळजापूरच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.
G

