रोचकरी यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही उमेदवारांना विक्रमी आघाडीची चिन्हे
तुळजापूर / सिद्दीक पटेल
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये महायुतीच्या उमेदवारांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद लक्षवेधी ठरत असून, या प्रभागात भाजप-महायुतीचा झंझावात अधिक तीव्र झाल्याची राजकीय चर्चेला जोर आला आहे. आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांच्या नेतृत्वावरील नागरिकांचा दृढ विश्वास आणि माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या कार्यकाळात साधलेल्या विकासकामांमुळे वातावरण अधिकाधिक एकतर्फी होत असल्याचे जाणवते.
विकासकामांची ठोस छाप
प्रभाग क्रमांक 10 मध्ये रस्ते, गटारे, प्रकाशव्यवस्था, पाणीपुरवठा, सार्वजनिक सोयीसुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवरील तातडीच्या प्रतिसादामुळे रोचकरी यांच्या कार्यकाळाची ठोस छाप आजही कायम आहे. प्रभागाचा चेहरामोहरा बदलण्यास कारणीभूत झालेल्या या कामांची मतदारांत चर्चा असून, याच विकासकारणावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
प्रियंका गंगणे यांच्या प्रचाराला वेग
प्रभाग क्रमांक 10 (ब) मधील भाजपाच्या उमेदवार सौ. प्रियंका विजय गंगणे यांच्या प्रचारात मोठी गती पाहायला मिळत आहे. त्यांच्या पती विजय गंगणे यांच्या प्रभावी जनसंपर्क मोहिमेचा त्यांना मोठा फायदा होत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत. घराघरांत होत असलेल्या संपर्क मोहिमेमुळे त्यांना उल्लेखनीय प्रतिसाद मिळत असून, गंगणे दांपत्याच्या सर्वसमावेशक प्रतिमेमुळे प्रभागातील विविध समाजघटक एकत्र येताना दिसत आहेत.
सर्वसमावेशक नेतृत्वाचा प्रभाव
कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवणाऱ्या सचिन रोचकरी यांनी गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांमुळे त्यांच्या नेतृत्वाची मजबूत ओळख प्रभागात निर्माण झाली आहे. जाती–धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करण्याची शैली रोचकरी आणि गंगणे या दोन्ही नेतृत्वांमध्ये समान दिसते. त्यांचे सहकारीही याच विचारधारेने काम करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेष जोश जाणवत आहे.
विजयाची चर्चा तेजीत
प्रभागभर चर्चेत असलेली महायुती उमेदवारांच्या विक्रमी आघाडीची शक्यता कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणारी आहे. घराघरांतून उमटणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता जनाधार पाहता या वेळी प्रभाग 10 भाजपाला ऐतिहासिक आघाडी देईल, अशी चर्चा जोर धरत आहे. कार्यकर्त्यांमध्येही अभूतपूर्व उत्साह असून, "यावेळी निकाल इतिहासात नोंदवला जाईल" अशी भावना व्यक्त केली जात आहे.


