तुळजापूर शहरात पंडितराव जगदाळे पडू लागले सर्वांवर भारी; नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे कमळ फुलणार!

mhcitynews
0


 नगरसेवक, उपनगराध्यक्ष पदाच्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असल्याने मतदारांची पसंती

तुळजापूर / सिद्दीक पटेल

तुळजापूर नगरपरिषद निवडणूक प्रचाराला गती आली असून, भारतीय जनता पार्टी महायुती पक्षाचे उमेदवार पंडितरावं देवीचंद जगदाळे या सर्वांवर भारी पडताना दिसत असून, नियोजनबद्ध प्रचार यंत्रणेमुळे त्यांचे निवडणूक चिन्ह कमळ मनामनात पोहोचला आहे. तर तब्बल 25 वर्ष नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष पदाच्या अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. यामुळे त्यांना मतदारांची पहिली पसंती मिळत असल्याने त्यांच्या पाठीशी सर्वांना सोबत घेऊन जाणारा हाकेला धावणारा मित्र परिवाराचे बळ असल्याने त्यांचा विजय सोपा असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. 


तुळजापूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार विनोद गंगणे हे आहेत. त्यांचा तुळजापूर शहरात एक राजकीय प्रलय असून त्यांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून समाज हिताची कामे केली आहेत. तर पंडित जगदाळे हे अभ्यासू आणि शांत, संयमी नेतृत्व म्हणून तुळजापूरकरांना परिचित आहेत. या दोघांनी आपली राजकीय पदाचा आणि ताकदीचा वापर केवळ सर्वसामान्यांच्या हितासाठी केलेला आहे. याची जाणीव तुळजापूरकरांना असल्याने शहरातील प्रत्येक कोपऱ्यात आणि गल्लीबोळात त्यांना मतदारांचा प्रतिसाद मिळत असून, 


हे पाहता जगदाळे यांना सर्व स्थरावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. यामुळे त्यांचा विजय सोपा होणार असल्याची चर्चा आहे. अखेर जनता कोणाला मतदान रुपी आशीर्वाद देते हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top