महाविकास आघाडीचा जोर वाढला? रॅलीने तुळजापूरात निर्माण केली नवी समीकरणे

mhcitynews
0


तुळजापूर – सिद्दीक पटेल

नगरपालिका निवडणूक 2025 ला रंगतदार वळण मिळत असताना तुळजापूरात बुधवारी महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन करीत जनसंपर्काचा जोरदार बिगुल फुंकला. जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्नी सौ. संयोजनी ओमराजे निंबाळकर यांनी घेतलेल्या भव्य रॅलीला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा आगामी घडामोडींना नवे समीकरण देणारा ठरला आहे.


विकास आणि पारदर्शक कारभाराचा संदेश अग्रस्थानी


रॅलीदरम्यान मतदारांना थेट संवाद साधत सौ. संयोजनी निंबाळकर यांनी “शहराचा खरा विकास करणाऱ्यांनाच संधी द्या” अशी विनंती केली. पारदर्शक कारभार, उत्तरदायी नेतृत्व आणि नागरिककेंद्री निर्णयप्रक्रियेवर त्यांनी विशेष भर दिला. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देण्याबाबत दिलेला संदेश जनतेत चांगलाच रिझला.


अखाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार एकवटले


या रॅलीत महाविकास आघाडीचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमर अशोकराव मगर आघाडीवर दिसले. त्यांच्या सोबत प्रभागनिहाय उमेदवारांची प्रभावी उपस्थिती जाणवली—प्रभाग क्र. 04 : विनोद सोंजी, अमृता वाघमारे, प्रभाग क्र. 09 : मोनिका रसाळ, अमोल कुतवळ, प्रभाग क्र. 08 च्या रेखा पांडांगळे, अक्षय धनंजय कदम उमेदवारांचा असा सामूहिक ‘वन-फ्रंट’ हा विरोधकांसाठी निश्चितच चिंतेचा विषय ठरणारा आहे.


नागरिकांचा प्रतिसाद उत्साहवर्धक – बदलाच्या हवेचा इशारा?


शहरातून निघालेल्या या रॅलीत महिलांचा मोठा सहभाग विशेषत्वाने जाणवला. स्थानिक तरुणांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवारांना पाठिंबा दर्शविला. रॅलीच्या प्रत्येक टप्प्यावर नागरिकांनी केलेले स्वागत, घोषणाबाजीचा उत्साह आणि जमावाचा प्रतिसाद पाहता महाविकास आघाडीच्या संघटनेत नवचैतन्य भरल्याचे स्पष्ट दिसून आले.


निवडणुकीत केवळ प्रचार नव्हे तर ठोस वचनांचा आणि कामगिरीचा अजेंडा घेऊन मैदानात उतरल्याचा संदेश आघाडीने या रॅलीतून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तुळजापूरच्या राजकारणातील ही रॅली फक्त शक्तिप्रदर्शन न ठरता, आगामी लढतीच्या दिशाही ठरवणारी ठरू शकते.


महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मिळालेला नागरिकांचा प्रतिसाद पाहता तुळजापूरच्या निवडणूक रंगभूमीवर नवे राजकीय तरंग उमटत असल्याचे दिसत आहे. एकसंध नेतृत्व, विकासाचा अजेंडा आणि प्रभागनिहाय उमेदवारांची आक्रमक रणनीती—हे घटक निवडणुकीत आघाडीला किती फायद्याचे ठरतात, हे २ डिसेंबरनंतर स्पष्ट होणार आहे

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top