श्री संत महादेव कासार यांच्या पुण्यतिथीचे तुळजापूरात आयोजन

mhcitynews
0


तुळजापूर प्रतिनिधी

भागवत धर्माची पहिली पताका लावणारे संत श्री महादेव कासार यांच्या पुण्यतिथीचे तुळजापूरात आयोजन करण्यात आले असून दि. १०नोव्हेंबर रोजी कार्तिक कृ. ६ रोजी हा सोहळा होणार आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जिजामाता नगर येथे सकाळी ९.०० वा. प्रतिमा पूजनाने सोहळ्याची सुरुवात होणार असून कीर्तन, प्रवचन, आरती व प्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप आहे. यासाठी सो. क्ष. कासार समाज, इस्कॉन धाराशीव, माऊली महिला भजनी मंडळ व हरे कृष्ण भक्त तुळजापूर यांनी पुढाकार घेतला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)
To Top