तुळजापूर / प्रतिनिधी
शहरातील सामाजिक क्षेत्रात कार्यरत व नावाजलेले इच्छापूर्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने नूतन नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे तसेच विविध प्रभागांतून निवडून आलेल्या नगरसेवकांचा भव्य सत्कार व यथोचित सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजित कोकाटे यांच्या हस्ते नूतन लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
लोकशाही प्रक्रियेतून निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांवर शहराच्या सर्वांगीण विकासाची मोठी जबाबदारी असून. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख कारभार घडावा, अशी अपेक्षा समाजाच्या वतीने व्यक्त करत. तसेच पुढील कार्यकाळासाठी सर्व लोकप्रतिनिधींना उपस्थितांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
तर शहराच्या विकासासाठी सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन काम करू, नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत नियोजनबद्ध विकास घडवण्याचा प्रयत्न राहील, असे आश्वासन सत्कारास उत्तर देताना नूतन नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी दिले.
या सत्कार सोहळ्यास इच्छापूर्ती प्रतिष्ठानचे पदाधिकारी, विविध सामाजिक कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक संस्थांकडून लोकप्रतिनिधींच्या पाठीशी उभे राहण्याचा हा उपक्रम शहरातील सकारात्मक वातावरण निर्माण करणारा ठरला आहे.

