तुळजापूर / प्रतिनिधी
तुळजापूर नगरपरिषदेच्या नुतन नगरसेविका डॉ. अनुजाताई अजितदादा कदम-परमेश्वर यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दिनांक ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत जिजामाता दवाखाना, आयुष्यमान आरोग्य मंदिर, जिजामाता नगर, तुळजापूर येथे होणार आहे.
या शिबिरामध्ये हृदयरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, बी.पी., मधुमेह, कर्करोग तपासणी, कान-नाक-घसा, त्वचारोग, पोटाचे विकार, अस्थिरोग तसेच मेंदू व मज्जारोग यांसारख्या आजारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्ष श्री. विनोद (पिंटू) गंगणे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाला अनेक मान्यवर, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शहरातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले असून, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
